धोत्रा नंदाई परिसरात साेयाबीन, कपाशीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:19+5:302021-09-26T04:37:19+5:30

धोत्रा नंदाई परिसरात १९८० ते ९० पासून कपाशी हे पीक महत्त्वाचे होते़ ज्वारी, मूग, उडीद पाठोपाठ सोयाबीन पिकाची ...

Damage of soybean and cotton in Dhotra Nandai area | धोत्रा नंदाई परिसरात साेयाबीन, कपाशीचे नुकसान

धोत्रा नंदाई परिसरात साेयाबीन, कपाशीचे नुकसान

धोत्रा नंदाई परिसरात १९८० ते ९० पासून कपाशी हे पीक महत्त्वाचे होते़ ज्वारी, मूग, उडीद पाठोपाठ सोयाबीन पिकाची पेरणी केली जात होती़ कपाशीची खरेदी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन करीत होती व इतर कडधान्य कृषी उत्पन्न बाजार समितीत विकल्या जात होते़ दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होत होती़ हळूहळू कपाशीची आणि ज्वारी मूग उडदाचा पेरा कमी होत गेला़ चांगला भाव मिळतो म्हणून या वर्षी सोयाबीनचा पेरा वाढू लागला़ कमर खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड सुरू केली़

साेंगणीचे काम ठप्प

परिसरातील ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ मागील वर्षी शेतकऱ्यांना एकरी १८ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन झाले होते़ यावर्षी मात्र अधिक पाऊस झाल्याने ४० ते ५० टक्के सोयाबीन पिकाला फटका बसला आहे़ गेल्या चार ते पाच दिवसांपासून या जोरदार पावसामुळे सोंगणीचे काम ठप्प झाले आहे़ फुटलेले कपाशीचे बाेंड पावसामुळे भिजत आहेत़

Web Title: Damage of soybean and cotton in Dhotra Nandai area