वादळी वाऱ्यामुळे सौर पॅनेलचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:56+5:302021-04-02T04:35:56+5:30
मेहकर : वादळी वाऱ्यामुळे खंडाळा येथील शेतकऱ्याच्या शेतातील सौर पॅनेलचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची ...

वादळी वाऱ्यामुळे सौर पॅनेलचे नुकसान
मेहकर : वादळी वाऱ्यामुळे खंडाळा येथील शेतकऱ्याच्या शेतातील सौर पॅनेलचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
दिनांक १९ मार्च रोजी मेहकर तालुक्यात वादळी वाऱ्याच्या थैमानामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पीक नुकसानासह काही शेतकऱ्यांच्या शेतातील मालमत्तांनाही हानी पोहोचली. यामध्ये खंडाळा येथील शेतकरी सुरेश परशराम मानघाले यांच्या गट क्रमांक १३३मधील बोअरवेलवर लावलेल्या सौर ऊर्जा पॅनेलचे नुकसान झाले आहे. हे पॅनेल पूर्णपणे तुटले असून, पॅनेल खाली मोडलेल्या अवस्थेत पडलेले आहे. या घटनेची संयुक्तरित्या पाहणी करून तलाठी व्ही. के. गारोळे, कृषी सहाय्यक देशमुख यांनी पंचनामा केला. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी सुरेश मानघाले यांनी केली आहे. ( फोटो )
--