आग लागून घरातील साहित्याचे नुकसान

By Admin | Updated: August 11, 2016 01:39 IST2016-08-11T01:39:15+5:302016-08-11T01:39:15+5:30

देऊळगावमही येथील घटना; सुदैवाने जिवीत हानी नाही.

Damage to house lighting in the fire | आग लागून घरातील साहित्याचे नुकसान

आग लागून घरातील साहित्याचे नुकसान

देऊळगाव मही (जि. बुलडाणा), दि १0 : शॉटसर्किट होऊन घरामध्ये लागलेल्या आगीत हजारो रुपयांचे घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याची घटना १0 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. गावातील शिवाजी कुंडलिक इंगळे यांच्या घरात आज सकाळी अचानक शॉटसर्किट होऊन आग लागली. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र त्यांच्या घरातील फ्रिज, मिक्सर, फॅन, पाणीफिल्टर व इतर घरगुती साहित्य असे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच, तलाठी जी.के. केवर व पोलीस पाटील रंगनाथ शिंगणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Web Title: Damage to house lighting in the fire