वस्तीत पाणी शिरल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:45+5:302021-06-18T04:24:45+5:30
लाखानवाडा, बुलडाणारोड, चिखली, खामगाव रोडचे बाजूच्या शासकीय बंद नाल्या व सफाईबाबत गत दोन वर्षांपासून व ३१ मे रोजी उंद्री ...

वस्तीत पाणी शिरल्याने नुकसान
लाखानवाडा, बुलडाणारोड, चिखली, खामगाव रोडचे बाजूच्या शासकीय बंद नाल्या व सफाईबाबत गत दोन वर्षांपासून व ३१ मे रोजी उंद्री ग्रामपंचायतीकडून लेखी पत्रान्वये संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून व निवेदन करूनही या विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व सफाई व दुरुस्ती केली नाही. त्यामुळे दोन्ही रोडचे बाजूला असलेल्या वस्तीतील घरात पाणी शिरून त्यांचे पेरणीसाठी आणलेले बियाणे, खते, जीवनावश्यक वस्तू व घरांचे नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे गावालगतचे अनेकांचे शेतातील पीक नुकसान झाले आहे.
पूर्वसूचना देऊनही प्रशासनकडून कोणतीही कारवाही न झाल्याने शेतकरी, कामगार व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना त्वरित आर्थिक मोबदला देण्यात यावा, खोदकाम व बांधकाम करून पाणी वाहते करून गावात होणारे संभाव्य नुकसान टाळावे, अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी दिला आहे.
रात्रभर चालले पाणी बाहेर काढण्याचे काम
उंद्री येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला साचलेले पाणी काढण्याचे काम रात्रभर चालले होते. रात्रभर युद्ध पातळीवर सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य व इतर नागरिकांनी वस्तीतील पाणी काढले; पण अजूनपर्यंत संबंधित प्रशासनाने दखल घेतली नसल्याची खंत ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केली.