शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
2
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
3
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
4
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
5
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
6
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
7
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
9
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
10
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
11
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
12
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
13
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
15
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
16
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
17
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
18
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
19
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
20
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:46 AM

Damage to crops due to untimely rains in Buldana district जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गत चार दिवसांत ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे २०९ गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्यात १८ मार्चपासून  अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने  कृषी क्षेत्राला तडाखा दिला असून, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील  ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, मलकापूर, मोताळा, खामगाव, नांदुरा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या  तालुक्यांना मोठा फटका बसला. १८ ते १९ मार्च  दरम्यान या तालुक्यातील २ हजार ८१२ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले होते. जवळपास १०० गावांतील ४ हजार ४३३ शेतकरी त्यामुळे प्रभावित झालेले आहेत. यात प्रामुख्याने एकट्या मेहकर तालुक्यात दोन हजार हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यानंतर २० व २१ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ४ हजार ११२ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यात ५ हजार ४०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.  खामगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. १०९ गावांत या अवकाळी पावसाने कहर केला आहे. १८ मार्च ते २१ मार्चदरम्यान झालेल्या एकंदरीत नुकसानाचा विचार करता ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सध्या कृषी विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी हे गावपातळीवर जाऊन झालेल्या नुकसानीचा एकंदरीत अंदाज घेत आहेत. दरम्यान, गेल्या खरीप हंगामातही तब्बल ७४ हजार हेक्टरवर अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा जादा पावसामुळे म्हणा जिल्ह्यात नुकसान झाले होते. त्यानंतर  उन्हाळ्यात हा फटका पावसाने दिला आहे.

या पिकांचे झाले नुकसानअवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, मका, गहू, केळी, पेरू, आंबा, भाजीपाला फळपिके, भुईमूग, ज्वारी, केळी, पपई, टरबूज, हरभरा, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. गारपीट व पावसामुळे आंब्याचा मोहरही गळून पडला असून, काही ठिकाणी कोयीने जाळे पकडलेल्या आंब्याला मोठा फटका बसला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीHailstormगारपीटFarmerशेतकरी