कपाशीचे नुकसान; भरपाईपोटी ३२ कोटींचा मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:44 IST2020-08-20T13:44:10+5:302020-08-20T13:44:16+5:30
ही रक्कम जिल्ह्यातील ९० मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.

कपाशीचे नुकसान; भरपाईपोटी ३२ कोटींचा मोबदला
बुलडाणा: गेल्या वर्षी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. दरम्यान, ही रक्कम जिल्ह्यातील ९० मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. परतीचा पाऊस आणि शेंद्री बोंड अळीमुळे गतवर्षी शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते.
प्राथमिक अंदाजानुसार गेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील एक लाख २८ हजार ६३७ हेक्टरवरील कापसाच्या पिकापैकी जवळपास ६० टक्के पिकांचे नुकसान झाले होते. जिल्हयात पडणाºया परतीच्या सरासरी पावसाच्या तुलनेत गत वर्षी तब्बल २१७ टक्के पाऊस पडला होता. अवघ्या नऊ ते ११ दिवसात हा पाऊस पडल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते तर काही भागात शेंद्री बोंड अळीचा कापसाच्या पिकाला फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी कापूस उत्पादक शेतकºयांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिली.
गेल्या वर्षी बुलडाणा जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकºयांपैकी ३३ हजार ८९८ शेतकºयांनी २५ हजार २४८ हेक्टरवरील कापूस पिकाचा विमा उतरवला होता. त्यापोटी ५४ कोटी २८ लाख रुपयांच्या आसपास शेतकºयांनी पीक विम्याचा त्यांच्या वाट्याला येणारा हिस्सा भरला होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाल्यास जवळपास १०८ कोटी रुपयापर्यंचे विम्याचे संरक्षण कापूस पिकाला जिल्ह्यात मिळाले होते. पैकी ३० हजार शेतकºयांना ३२ कोटीची नुकसान भरपाई मिळाली.