उदघाटनाआधीच डागडूजी

By Admin | Updated: July 14, 2014 23:04 IST2014-07-14T23:04:50+5:302014-07-14T23:04:50+5:30

सिंदखेडराजा : क्रीडा संकुल सज्ज दाखविण्यासाठी थातूरमातूर बांधकाम

Dagduji before the inauguration | उदघाटनाआधीच डागडूजी

उदघाटनाआधीच डागडूजी

सिंदखेडराजा : स्थानिक क्रीडा संकुल इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. लोकार्पण सोहळ्याच्या मुहूर्तावर इमारत सज्ज होण्यासाठी थातूरमातूर बांधकाम केलेल्या इमारतीची डागडुजी सुरु आहे. शहरातील क्रीडा संकुल इमारत व विविध खेळाच्या मैदानासाठी शासनाने गत २ वर्षापूर्वी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. सदर काम १ वर्षापूर्वी पूर्ण होण्याचे शासनाचे आदेश होते. सदर ठेकेदाराने क्रीडा संकुल इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे २ वर्षे उलटूनही इमारत व खेळाच्या मैदानाची डागडूजी सुरुच आहे. तसेच गत पावसाळ्यातही इमारतीत पावसाचे टपकत होते. तर दुसर्‍या माळ्यावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायर्‍याही अर्धवट आहेत. इमारतीवरील कठडेही तुटले असून, त्याची सुद्धा डागडूजी सुरु आहे. स्वागत गेटपासून इमारतीपर्यंत झालेल्या रस्त्याचे काम अर्धवट व निकृष्ट आहे. येथील पाईपही अनेक ठिकाणी फुटलेले आढळून येतात. ठेकेदाराने भ्रष्टाचार करुन सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असून यासंदर्भात सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.

Web Title: Dagduji before the inauguration