जयस्तंभ चौकातील पुतळ्यांसाठी ‘डफडे बजाव’

By Admin | Updated: December 6, 2015 02:35 IST2015-12-06T02:35:00+5:302015-12-06T02:35:00+5:30

बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात पुतळे बसविण्यासाठी आंदोलन.

'Dafde Bajav' for statues of Jayastambha Chowk | जयस्तंभ चौकातील पुतळ्यांसाठी ‘डफडे बजाव’

जयस्तंभ चौकातील पुतळ्यांसाठी ‘डफडे बजाव’

बुलडाणा: सुमारे तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाण्याच्या टाकीत बसून आंदोलन केल्यानंतरही प्रशासनाने पुतळे बसविण्याविषयी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे आंदोलकांनी एकत्रित येऊन शनिवारी डफडे बजाव आंदोलन केले. पुतळा संघर्ष समितीने शहरातील मुख्य मार्गांवरून डफडे वाजवित शहरवासीयांचे लक्ष वेधले. जयस्तंभ चौकातील शासकीय भूखंडावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे बसवावे, अशी मागणी समितीची आहे. याशिवाय बुलडाणा शहरातील विविध वार्डांंमधील अतिक्रमणधारकांना जागेचे कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे ही मागणीसुद्धा आजच्या आंदोलनाद्वारे करण्यात आली. या आंदोलनात बाळा राऊत, भीमराव तायडे, समाधान जाधव, अँड. गणेश इंगळे, अँड. सतीश खंडारे, अर्जुनराव खरात, बंडू भिसे, सत्यजित घेवंदे आदींसह सहभाग होते.

Web Title: 'Dafde Bajav' for statues of Jayastambha Chowk