शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्यातील सीताफळ जयपूर, इंदुरच्या बाजारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:12 IST

Buldhana Agriculture News सीताफळाची लागवड करून राजेंद्र वाघमारे यांनी तोट्यात जाणाऱ्या शेतीचे फायद्यात रूपांतर केले.

- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : पाण्याची कमतरता, त्यात जमीनीचा पोत खराब, अशा परिस्थितीत सातत्याने नुकसान सोसावे लागत असल्याने पारंपारीक पिकाला फाटा देत कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळाची लागवड करून राजेंद्र वाघमारे यांनी तोट्यात जाणाऱ्या शेतीचे फायद्यात रूपांतर केले. त्यांच्या शेतातील उच्च दर्जाचे सीताफळ थेट जयपूर आणि इंदुरच्या बाजारात विकले जात आहेत. लाखो रूपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.तालुक्यातील सोमठाणा येथील राजेंद्र श्रीराम वाघमारे हे उच्चशिक्षित, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चिखली येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शेतीशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. त्यांच्याकडे साडेसात एकर जमीन आहे. डोलखेडा येथील दत्तात्रय राऊत यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांनी ३ एकरावर  काटक अशा सीताफळाची २०१५ मध्ये लागवड केली. लागवडी पश्चात तीन वर्षांनंतर त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. तीन एकर शेतात १० बाय १० या अंतरावर ८०० सीताफळांच्या झाडांची लागवड केली. झाडांना ठिबकव्दारे पाणी देऊन जगविण्याचे काम केले. राज्यातील विविध भागातील शेतकरी त्यांची शेती पहायला येतात. पहिल्या वर्षी साडेतीन लाख, दुसऱ्या वर्षी चार लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. यंदा मध्यप्रदेशातील इंदुर येथून मागणी आली असून ८० ते १३० रूपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळत आहे.

सीताफळ हे कमी पाण्यात येणारे फळपीक असल्याने याकडे आता अनेक शेतकरी वळले आहे. लागवड जास्त होत असल्याने भाव कमी होत आहेत. आपल्या भागात सीताफळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी होणे गरजेचे आहे. -राजेंद्र वाघमारे,  सोमठाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीagricultureशेतीFarmerशेतकरी