जामोद येथे संचारबंदी शिथिल

By Admin | Updated: April 20, 2016 02:01 IST2016-04-20T02:01:33+5:302016-04-20T02:01:33+5:30

जनजीवन पूर्वपदावर; पोलिसांनी काढला गावक-यांसोबत शांतीमार्च.

Curfew relaxed at Jamod | जामोद येथे संचारबंदी शिथिल

जामोद येथे संचारबंदी शिथिल


जामोद (जि. बुलडाणा): येथे शनिवारी रात्रीपासून लावलेली संचारबंदी मंगळवारी शिथिल करण्यात आली असून, मंगळवारी सकाळी ९.३0 वाजता कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सर्वधर्मीय तथा सर्वपक्षीय शांतीमार्च काढण्यात आला. या शांतीमार्चला बसथांब्याजवळून सुरुवात झाली. त्यानंतर हा शांतीमार्च सुभाष चौक, बेंबळेश्‍वर मंदिर, जैन मंदिर परिसरातून पेठपुरा, पोलीस चौकी रोड ते मशीदजवळून पुन्हा सुभाष चौकातून बस थांब्याजवळ आल्यानंतर शां तीमार्चचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांनी गावकर्‍यांना आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु करून शांतता राखण्याचे आवाहन केले. या शांतीमार्चमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विकास झाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, तहसीलदार अनिलकुमार हेडकर, ठाणेदार विजय पाटकर, माजी जि.प.सदस्य कैलास बोडखे, माजी जि. प.अध्यक्ष प्रकाश पाटील, खालीकबाप्पु देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, बाबू जमादार, जि.प.सदस्य सुरेश अंबडकार, पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे, आशा डाबेराव, सरपंच झुमकी चन्नीलाल, पोलीस पाटील रतनलाल गांधी, भारिप- बमसं तालुकाध्यक्ष अरुण पारवे, हुसेन डायमंड, राजू कोकाटे, अमानसेठ जळगाव, पुरुषोत्तम राठी, अनिल चांडक, मुजम्मील खान नांदुरा, नगर परिषद उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, कैलास डोबे, ग्रा.पं.सदस्य पुष्पा धुर्डे, सुमित्रा कपले, माजी सरपंच पुंडलीक ढगे, युसूफ मेंबर, विजय वानखडे, मोठय़ा संख्येने पोलीस ताफा, पत्रकार तथा गावातील बहुसं ख्य हिंदू-मुस्लीम तथा महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Curfew relaxed at Jamod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.