शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पीक विमा कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा- संजय कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 11:55 IST

Sanjay Kute Slams State Government over Crop insurance : शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांऐवजी ४ हजार २०० कोटी रूपयांचा फायदा विमा कंपनीचा होत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आ. डॉ. संजय कुटे यानी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी पिक विमा योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने राज्यात सात विविध कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांना लाभ दिल्या जातो. युतीशासनाच्या काळात ५ हजार ७९५ कोटी रूपयांचा विमा ८५ लाखांवर शेतकऱ्यांना मिळाला होता. पंरतु राज्यातील सध्याच्या आघाडी शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांऐवजी ४ हजार २०० कोटी रूपयांचा फायदा विमा कंपनीचा होत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आ. डॉ. संजय कुटे यानी केला.शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच राज्य शासनाला सुद्धा अधिवेशन काळात जाब विचारणार असल्याचे  ते म्हणाले.शेतकरी पिक विमाच्या प्रश्नावर २ जुलै रोजी स्थानिक पत्रकार भवनामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री संतोषराव देशमुख, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, आशिष व्यवहारे, हर्षल जोशी उपस्थित होते.आ. डॅा. संजय कुटे म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यात जळगांव जामोद, संग्र्रामपूर, शेगांव तालुक्यांना 100 टक्के सोयाबीन पिकांचा विमा लागतो. त्यासाठी केवळ तांत्रीक अडचणी निर्माण करून विमा कंपनी चार महिन्यापासून शेतकऱ्यांना वंचीत ठेवत आहे.  त्यामुळे या प्रश्नी आम्ही आवाज उठविणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Dr. Sanjay Kuteसंजय कुटेCrop Insuranceपीक विमाbuldhanaबुलडाणाPoliticsराजकारण