औषध फवारणी करून पीक जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:56+5:302021-07-11T04:23:56+5:30

डोणगांव : तीन एकरांतील पिकावर औषध फवारणी करून जाळल्याची तक्रार बुद्धू जूम्मा रेघीवाले यांनी पाेलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात ...

The crop was burnt by spraying the drug | औषध फवारणी करून पीक जाळले

औषध फवारणी करून पीक जाळले

डोणगांव : तीन एकरांतील पिकावर औषध फवारणी करून जाळल्याची तक्रार बुद्धू जूम्मा रेघीवाले यांनी पाेलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ पीक जाळणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात केली आहे़

रेघीवाले यांच्या शेतात उडीद व तूर हे पीक पेरलेले हाेते़ पीक चांगल्या स्थितीत असताना गजानन सुखदेव लांभाडे याने पिकावर औषधाची फवारणी केली़ त्यामुळे, पीक पिवळे पडले आहेत़ त्यामुळे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे रेघीवाले यांनी निवेदनात म्हटले आहे़ याविषयी २९ जूनला डाेणगाव पाेलिसांत तक्रार दिलेली आहे़ मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही़ त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे़

100721\20210710_121148.heic

जळालेले पिक

Web Title: The crop was burnt by spraying the drug