शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळावर ओढावले 'टायर पंक्चर'चे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 16:58 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील एसटी बसगाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात आता रस्त्यांची कामे सुरू असल्याने एसटीचे टायर पंक्चर होण्याचे संकट ओढावले असून प्रवाशांना रस्त्यावर अडकुन बसावे लागत आहे.

बुलडाणा: जिल्ह्यातील एसटी बसगाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात आता रस्त्यांची कामे सुरू असल्याने एसटीचे टायर पंक्चर होण्याचे संकट ओढावले असून प्रवाशांना रस्त्यावर अडकुन बसावे लागत आहे. दिवसाला प्रत्येक आगारामध्ये १० ते १५ बसेस पंक्चर काढण्यासाठी येत आहेत. सध्या सर्वत्र रस्त्यांची नुतनीकरण, रुंदीकरण यासाखे विविध कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले असून काही ठिकाणचे काम अर्धवट झालेली आहे. खराब रस्त्यांमुळे एसटी आधीच खिळखिळी झाली आहे. त्यात आता टायर पंक्चर होण्याचे प्रकार वाढलेले दिसून येत आहेत. अनेकवेळा टायर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. टायर व ट्यूबचा वेळेवर पुरवठा न झाल्यास जुन्याच टायरवर बस सोडल्या जाते. जिल्ह्यात सर्वत्रच अशी स्थिती आहे. बसेसना खराब टायर लावून बस मार्गस्थ केल्या जात असल्याने टायर वारंवार पंक्चर होण्याचा धोका वाढला आहे. बसचा टायर पंक्चर झाल्यास  प्रवाशांचा रोष चालक व वाहकांवर येतो. बसेसना टायरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने जुनेच टायर वापरावे लागत आहेत. काही टायर तर पूर्ण गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच टायर पंक्चरचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे.  

 एशियाड बसेसचे टायरही जुनाटसाध्या बसेस पाठोपाठ एशियाड बसेसचेही टायर जुनाट बसविले जात असल्याने  टायर पंक्चरचे प्रकार वाढत आहेत. मेहकर आगाराची ही बस   मेहकर ते जळगाव जाणारी (क्र. एम-एच- के-आर- ५०७५) एशीयाड बस १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता चिखली येथे पंक्चर झाली. त्यामुळे समारे जाणाºया प्रवाशांना अनेक तास चिखली येथेच अडकुन बसावे लागले.  या बसचे बसभाडे इतर बसपेक्षा जास्त असूनही प्रवाशांना जादा भाड्यावर साध्या बसमध्ये जावे लागले. असाच प्रकार वारंवार होत असल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ