बुलडाणा जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:22 PM2020-07-03T13:22:16+5:302020-07-03T13:22:29+5:30

सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केलेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.

Crisis of double sowing on 688 farmers in Buldana district! | बुलडाणा जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

बुलडाणा जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात सरासरी ७० टक्के खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ८०० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६८८ शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केलेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.
मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर खरीप हंगामाची पेरणी केल्यानंतर चांगले उत्पादन मिळते. परंतू दरवर्षी पाऊस लांबत असल्याने मृग नक्षत्रातील पेरणीचा मुहूर्त हुकत बेभरवश्याच्या या पावसाचा शेतकºयांना दरवेळी फटका बसतो. यंदा मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने बहुतांश शेतकºयांनी पेरणी उरकली. परंतू पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांच्या आनंदावर विरजण पडले. पावसाची दांडी, त्यात बोगस बियाण्यांचा फटका असे दुहेरी संकट शेतकºयांवर निर्माण झाले आहे. सध्या ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ६३ हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांमुळे, तर कुठे पाऊस न झाल्याने सोयाबीन उगवलेच नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. १ जुलैपर्यंत सोयाबीन न उगवल्याच्या ६८८ शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. ८०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे बियाणे उगवलले नाही. तालुकास्तरीय समित्यांच्या माध्यमातून शेतकºयांच्या तक्रारीनंतर पंचनामे करण्यात येत आहेत. ज्या कंपन्या शेतकºयांसाठी सहकार्याची भूमिका ठेवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले.

सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे क्षेत्र
जिल्ह्यात एकूण पेरणीच्या ४ लाख ९ हजार २११ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन असते. सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनचे आहे. सोयाबीन पाठोपाठ जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र आहे. १ लाख ६८ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा होतो. सध्या १ लाख ५५ हजार ५४६ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली.


माझ्या पाच एकर शेतात मी १० जूनला सोयाबीनची पेरणी केली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. शेतात तुरळक ठिकाणी सोयाबीन उगवले. ते वखरुन दुबार पेरणी करावी लागत आहे.
-गोपाल पाझडे, शेतकरी साखरखेर्डा.


सोयाबीन बियाणे उगवुन आले नाही. त्यामुळे मला दुबार पेरणी करावी लागली. ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने आता पेरण्या यशस्वी झाल्या आहेत. आता मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
-आत्माराम नरवाडे,
शेतकरी, सावळी.

Web Title: Crisis of double sowing on 688 farmers in Buldana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.