शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

बुलडाणा  जिल्ह्यात ५२७ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:48 IST

जिल्ह्यातील ५२७ शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

- ब्रह्मानंद जाधवबुलडाणा: जिल्ह्यात सरासरी ७० टक्के खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ६१७ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५२७ शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केलेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर खरीप हंगामाची पेरणी केल्यानंतर चांगले उत्पादन मिळते. परंतू दरवर्षी पाऊस लांबत असल्याने मृग नक्षत्रातील पेरणीचा मुहूर्त हुकत. बेभरवश्याच्या या पावसाचा शेतकºयांना दरवेळी फटका बसतो. यंदा मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने बहुतांश शेतकºयांनी पेरणी उरकली. कित्येक वर्षानंतर मृगात पेरणी झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांच्या आनंदावर विरजण पडले. पावसाची दांडी, त्यात बोगस बियाण्यांचा फटका असे दुहेरी संकट शेतकºयांवर निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सध्या ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ६३ हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांमुळे, तर कुठे पाऊस न झाल्याने सोयाबीन उगवलेच नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. २९ जूनपर्यंत सोयाबीन न उगवल्याच्या ५२७ शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. ७१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे बियाणे उगवलले नाही. कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या तालुकास्तरीय समित्यांच्या माध्यमातून शेतकºयांच्या तक्रारीनंतर पंचनामे करण्यात येत आहेत. ज्या कंपन्या शेतकºयांसाठी सहकार्याची भूमिका ठेवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधिषक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती