जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: June 9, 2015 00:20 IST2015-06-09T00:20:52+5:302015-06-09T00:20:52+5:30
जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या फिर्यादीवरून माजी आमदारद्वयांवर गुन्हा दाखल.

जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी गुन्हा
खामगाव : जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिसांनी माजी आ. दिलीपकुमार सानंदा, माजी आ. नानाभाऊ कोकरे, भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने, नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिवाजी नगर पो.स्टे.चे पोहेकाँ दिलीपसिंह राजपूत यांनी फिर्याद दिली की, जिल्हाधिकार्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असताना ऋषी संकुल परिसरात शेतकरी प्रगती पॅनलचा मेळावा घेण्यात आला. या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिसांनी माजी आ. दिलीपकुमार सानंदा, माजी आ. नानाभाऊ कोकरे, भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, अंबादास वानखडे, पाटेखेडे यांच्यासह प्रगती पॅनलच्या उमेदवारांविरुद्ध कलम १३५ मपोकानुसार गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात माजी आमदार दिलीपकुमार सांनदा यांनी कृउबास निवडणुकीत भाराकाँ, भारिप-बमसं व राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊन शेतकरी प्रगती पॅनल गठित झाल्याने व या पॅनलचा विजय दिसू लागल्याने दबावतंत्राचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा अरोप केला.