मारहाणप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:17 IST2017-08-01T00:16:08+5:302017-08-01T00:17:36+5:30

अमडापूर : हरणी येथे शुल्लक कारणावरून मारहाण झाली असून, याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Criminal cases filed against nine accused | मारहाणप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल

मारहाणप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल

ठळक मुद्देशुल्लक कारणावरून मारहाणगयाबाई मोहिते या महिलेने अमडापूर पो.स्टे.ला दिली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : हरणी येथे शुल्लक कारणावरून मारहाण झाली असून, याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
गयाबाई आश्रु मोहिते रा.हरणी या महिलेने अमडापूर पो.स्टे.ला तक्रार दिली की, ३० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपी हरिदास मोहिते, देवीदास मोहिते, धनराज मोहिते, दुर्गेश मोहिते, राजेश मोहिते, कौसाबाई मोहिते, बाली देवीदास मोहिते, राजूबाई मोहिते व छबु बाबूलाल मोहिते यांनी मारहाण केली. तक्रारीवरून कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास ए.एस.आय मोतीलाल लोटन, सुनील चौधरी हे करीत आहेत.

Web Title: Criminal cases filed against nine accused