बालकामगार ठेवल्यामुळे व्यावसायिकावर गुन्हा
By Admin | Updated: February 27, 2015 01:11 IST2015-02-27T01:11:46+5:302015-02-27T01:11:46+5:30
लोणार येथील घटना.

बालकामगार ठेवल्यामुळे व्यावसायिकावर गुन्हा
लोणार (जि. बुलडाणा): उन्हाळ्यात शीतपेयाचा व्यवसाय करण्याकरिता उत्तरप्रदेशातून लोणार येथे आलेल्या एका व्यावसायिकावर बालकामगार ठेवल्यामुळे २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेशातील सत्तार सर जि.कलोज येथील हिमदुलखान रजाक खान हे शीतपेयाचा व्यवसाय करण्याकरिता लोणार येथे आले आहेत. त्यांनी आपल्या दुकानावर फिरोज खान महंमद हनिफ खान (१0) हा बाल कामगार ठेवला असल्याचे बुलडाणा येथील बालकामगार अधिकारी प्रशांत रामकृष्ण महल्ले यांना आढळून आले. त्यावरुन त्यांनी शीतपेय व्यावसायिक हिमदुलखान रजाक खान याच्याविरुद्ध बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.