वनक्षेत्रात आगी लावणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:30 AM2020-05-10T10:30:35+5:302020-05-10T10:30:43+5:30

वनविभागाची धडक मोहीम: एप्रिल, मे महिन्यात लावल्या होत्या आगी.

Crimes against seven people who started a forest fire | वनक्षेत्रात आगी लावणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हे

वनक्षेत्रात आगी लावणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हे

Next

 बुलडाणा: वनक्षेत्रामध्ये आग लागण्यास कारणीभूत ठरलेल्या सात जणांविरोधात वनविभागाने गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, यावर्षीपासून आगीच्या घटना अधिक गांभिर्याने घेण्याची भूमिका वनविभागाने स्वीकारली असून त्यातंर्गतच धडक मोहिम राबवून ही कारवाई करण्यात आली. उन्हाळ््यात प्रामुख्याने वनक्षेत्रात आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडतात.  त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक वनविभागानेही अशी प्रकरणे गंभीरतेने घेण्यास प्रारंभ केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रादेशिक वनक्षेत्रातंर्गत ८० हजार ८१६ हेक्टर  क्षेत्र येत असून यामध्ये आग लागल्याची माहिती बºयाचदा वनविभागाला मिळते. त्यांनंतर यंत्रणा लगोलग घटनास्थळी दाखल होऊन आग विझविते. मात्र ही आग कशी लागली त्याची कारणमिमांसा करण्यात वनविभाग कमी पडत होता. आगीस कारणीभूत नेमके कोण आहे याचा शोध घेणे जिकरीचे बनत होते. मात्र यावर्षी पासून अशा घटनांचा सखोलपणे विचार करून वनव्याप्त क्षेत्रात आगी लावणाºयांविरोधात धडक मोहिम राबविण्यास वनविभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुषंगाने दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशच जिल्हा उपवनसंरक्षक संजय माळी यांनी फायटर सेलचे प्रमुख तथा सहाय्यक वनसंरक्षक रजणीत गायकवाड यांना दिले आहेत.

आगीत २१ हेक्टर क्षेत्र जळाले

एप्रिल आणि मे महिन्यात लागलेल्या आगीचा शोध घेण्यात येऊन सात ठिकाणी लागलेल्या आगी प्रकरणी  जळगाव जामोद वनपरीक्षेत्रातंर्गत सरदार तडवला (रा. चारठाण), अरुण शंकर सईरिशे (रा. भेंडवळ) विठ्ठल विश्वनाथ पाखरे (रा. भेंडवळ), मोताळा वनपरिक्षेत्रातंर्गत अंकुश मोहन चव्हाण (रा. मोहेगाव), खामगाव वनपरिक्षेत्रातंर्गत कनिराम रेखमल चौहाण (रा. दस्तापुर), बुलडाणा वनपरीक्षेत्रातंर्गत डोंगळखंडाळा येथील दामोदर भागाजी वाकोडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील एकाला न्यायालयातही हजर करण्यात आले होते. दरम्यान यांनी लावलेल्या आगीमध्ये २१ हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. यातील चार घटनात शेतातील बांध जाळतांना आग जंगलात पसरल्याचे तपासात समोर आले आहे. प्रकरणी शेतकºयांनी आग लावताना ती जंगलात पसरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक रणजीत गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Crimes against seven people who started a forest fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.