इजलापूर येथील अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा
By Admin | Updated: April 11, 2017 00:17 IST2017-04-11T00:17:01+5:302017-04-11T00:17:01+5:30
इजलापूर येथील अल्पवयीन प्रेमीयुगुल पलायनप्रकरणी आरोपी मुलावर १0 एप्रिल रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इजलापूर येथील अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा
धाड(जि. बुलडाणा): येथून जवळच असलेल्या इजलापूर येथील अल्पवयीन प्रेमीयुगुल पलायनप्रकरणी आरोपी मुलावर १0 एप्रिल रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ७ एप्रिल रोजी नोंदवली. पोलिसांनी तपास यंत्रणा कामास लावत अवघ्या १२ तासांतच प्रेमीयुगुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी सुरुवातीला ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणी प्रकरणाची चौकशी करीत आणि संबंधित दोघे मुलगा-मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी दोन्ही कुटुंबाच्या जबानी घेत या प्रकरणात मुलीची वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणी अहवालानुसार मुलीवर अतिप्रसंग केल्याचे सिद्ध झाल्याने या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कलम ३७६ आणि कलम ४ बाल लैंगिक सुरक्षा अधि. २0१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य वाढतच असल्याने त्यादृष्टीने पोलीस याचा सखोल तपास करीत आहेत.
प्रेमप्रकरणातून निर्माण होणार्या चुकांचे दुष्परिणाम पाहता पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. तर आरोपीस वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले असून, त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव, पीएसआय रघुनाथ शेवाळे, माधव कुटे, बळीराम खंडागळे, ओमप्रकाश साळवे करीत आहेत.