संशयास्पद मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा

By Admin | Updated: October 29, 2014 00:12 IST2014-10-29T00:12:47+5:302014-10-29T00:12:47+5:30

लोणार-सुलतानपूर मार्गावरील खुनप्रकरणात गुन्हा दाखल.

The crime of murder in suspicious death | संशयास्पद मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा

संशयास्पद मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा

मेहकर (बुलडाणा) : लोणार-सुलतानपूर रोडवरील खोकडतळावर २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ३२ वर्षीय इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मेहकर तालुक्यातील पार्डा येथील शिवाजी साहेबराव तांगडे (३२) हा २५ ऑक्टोबर रोजी बाहेरगावी जातो म्हणून घरुन निघून गेला होता, तो परत आलाच नाही. दरम्यान शिवाजी तांगडेचा मृतदेह खोकडतळावर आढळून आला होता. यासंदर्भात पार्डा येथील तानाजी तांगडे यांनी मेहकर पो.स्टे.ला फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी आज अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३0२, २0१ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: The crime of murder in suspicious death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.