तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षासह तिघांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा

By Admin | Updated: January 7, 2017 03:02 IST2017-01-07T03:02:09+5:302017-01-07T03:02:09+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

The crime of molestation against the three, along with the president of the Tantamukti Samiti | तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षासह तिघांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षासह तिघांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा

जलंब (बुलडाणा), दि. ६- शेतातून घरी येत असलेल्या ४0 वर्षीय विवाहीतेचा विनयभंग केल्याची घटना ४ जानेवारी रोजी दुपारी तरोडा-डी शिवारात घडली. याप्रकरणी गुरुवारी पोलीसांनी तंटामुक्ती समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्यासह तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.
तरोडा-डी येथील ४0 वर्षीय विवाहता दुपारी शेतातून गावामध्ये येत असताना सुनील गुलाबचंद सराफ (खामगाव) तसेच मच्छिंद्रखेड येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास सुगदेव ससाने व ग्रा.पं.सदस्य राहूल शेषराव खंडारे यांनी फिर्यादी महिलेला अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित महीलेच्या तक्रारीवरुन आरोपी सुनील गुलाबचंद सराफ, विलास सुगदेव ससाने व राहुल शेषराव खंडारे यांच्याविरूध्द कलम ३५४, २९४, १४३, १४७, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: The crime of molestation against the three, along with the president of the Tantamukti Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.