‘त्या’ गुन्ह्यात बलात्काराचे कलम समाविष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:34 IST2021-03-20T04:34:22+5:302021-03-20T04:34:22+5:30
तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय महिलेने या प्रकरणी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यांची १३ वर्षीय मुलगी १२ मार्च ...

‘त्या’ गुन्ह्यात बलात्काराचे कलम समाविष्ट
तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय महिलेने या प्रकरणी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यांची १३ वर्षीय मुलगी १२ मार्च रोजी घरात असताना गावातील किसना गायकवाड (२१) याने तिचा हात पकडून बाजूला घेऊन गेला व गावातील रामा नामक मुलाशी बोलण्याबाबत सांगितले. मुलीने नकार दिल्यामुळे तुझे आणि त्या मुलाचे काय संबंध आहेत हे तुझ्या घरी सांगतो, असे म्हणत तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींविरोधात गुन्हे दाखल केेले होते. सोबतच पॉक्सो कायद्यांतर्गत कलम दाखवून आरोपींना अटकही केली होती.
दरम्यान, पीडित मुलीवर ८ मार्च रोजी लैंगिक अत्याचार झाल्याची बाब तिने तिच्या आईला सांगितली. सदर बाब पीडितेच्या आईने तपास अधिकारी पीएसआय अनिल भुसारी यांना शुक्रवारी सांगितली. पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांचा जबाब नोंद केला असून, या गुन्ह्यात आता पोलिसांनी बलात्काराचे कलमही समाविष्ट केेले आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दोघे आरोपी सध्या बुलडाणा येथील कारागृहात असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक माधव गरुड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अनिल भुसारी करीत आहेत.