विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:37 IST2021-05-20T04:37:27+5:302021-05-20T04:37:27+5:30

माळवंडी येथील पल्लवी चव्हाण हिने तीनवर्षीय मुलगी जान्हवी चव्हाण हिच्यासह शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी ...

Crime of inciting a married woman to commit suicide | विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

माळवंडी येथील पल्लवी चव्हाण हिने तीनवर्षीय मुलगी जान्हवी चव्हाण हिच्यासह शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी फिर्यादी, मृत विवाहितेचे वडील विष्णू पडोळ (राहणार डोमरूळ) यांनी रायपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली़. यामध्ये मृत विवाहितेचा पती गणेश चव्हाण याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे तो पत्नीला मारहाण करीत हाेता. त्याच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले हाेते.

त्यावरून पोलीस अधीक्षक चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोलीस स्टेशन ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी आरोपी गणेश चव्हाण, जगदीश चव्हाण, सुमन चव्हाण, रेखा सावळे (सर्व राहणार माळवंडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आमदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, अमोल गवई, सुरेश मोरे हे करीत आहेत.

Web Title: Crime of inciting a married woman to commit suicide