‘व्हॉटस् अँप’वर बदनामीप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: July 20, 2015 23:13 IST2015-07-20T23:13:43+5:302015-07-20T23:13:43+5:30

सोशल साईटवर बदनामीकारक माहिती अपलोड केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Crime in defamation case on 'What's ape! | ‘व्हॉटस् अँप’वर बदनामीप्रकरणी गुन्हा

‘व्हॉटस् अँप’वर बदनामीप्रकरणी गुन्हा

बुलडाणा : एनजीओ म्हणून काम करणार्‍या सेवाभावी संस्थेच्या विरोधात ह्यव्हॉटस् अँपह्ण या सोशल साईटवर बदनामीकारक माहिती अपलोड केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात मातृभूमि फाऊंडेशनच्या व्यवस्थापिका नंदीशा नंदकिशोर मोरे रा. मुठ्ठे ले-आऊट यांनी पोलिसांत २0 जुलै रोजी तक्रार दिली की, समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने वसीम शेख आणि जितू कायस्थ यांनी मोबाइलद्वारे व्हॉटस् अँप या सोशल साईटवर संस्थेबाबत चुकीची, बदनामीकारक माहिती अपलोड करुन ती इतरत्र पसरवली. या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी दोघांविरूद्ध भादंवि ५00, ५0१ तसेच कलम ६७ आयटी अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नारायण तांदळे करीत आहेत.

Web Title: Crime in defamation case on 'What's ape!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.