बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला

By Admin | Updated: December 8, 2014 01:33 IST2014-12-08T01:33:45+5:302014-12-08T01:33:45+5:30

एका महिन्यात ६ खून, १५ आत्महत्या व ३0 हाणामारीची प्रकरणे.

Crime in Buldana district increased | बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला

बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला

बुलडाणा : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याचे बोलले जात आहे; मात्र प्रत्यक्षात नागरिकांमध्ये कायद्याची भीती उरलीच नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. गत एका महिन्यात जिल्हाभरात वैमनस्यातून वचपा काढण्यात सहा लोकांची हत्या करण्यात आली. तर कौटुंबिक, सामाजिक व्यवस्थेला कंटाळून १५ लोकांनी मृत्यूला कवटाळले. शिवाय ३0 ठिकाणी हाणामारीच्या प्रकारातून सामाजिक शांतात भंग झाली.
मागील नोव्हेंबर महिन्याच्या अपराधाविषयी घटनांचा लेखाजोखा घेतला असता, गुन्ह्याचे प्रमाण वाढलेले आढळून आले. यामुळे किती मोठय़ा प्रमाणात हानी झाली, हे त्या घटनांचे परिणाम भोगणारे कुटुंबीयच सांगू शकेल. यात काही गुन्हे घराच्या चार भिंती आड घडले, तर काही समाजात घडले; मात्र यामुळे समाज मन पूर्णपणे ढवळून निघाले. मानसिक रोगांना बळी पडल्याने, बुद्धी आणि विवेक हरवून बसलेल्या काहींनी आत्महत्यासारखा मार्ग स्वीकारला. तर काहींनी वैमनस्यला खतपाणी घालून हत्या करण्याचा मार्ग स्वीकारला.
देऊळगाव राजा येथे ३0 नोव्हेंबर रोजी वाहनाच्या चाकाखाली चिरडून युवकाने आ पल्याच सहकार्‍याची हत्या केली. तर २ डिसेंबर रोजी कौटुंबिक कलहातून खामगाव येथे देरानीने जेठानीला भोसकून यमसदनी पाठविले. याच दिवशी आपसी वैमनस्यातून हत्येची सुपारी देऊन िपंपळगावराजा येथे एकाचा खून करून विहिरीत फेकले. खामगाव शहरातील सिव्हिल लाईन भागात दारू पिण्याच्या सवयीतून पती-पत्नीत वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, यातून पत्नीला संपविण्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडला.
पैशाच्या वादातून सहकार्‍यांनी एका इसमाच्या गळ्याभोवती चाकू फिरविल्याची घटना वडनेर भोलजी येथे २१ नोव्हेंबर रोजी घडली. तर अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी डोणगाव शिवारात घडली. याशिवाय बुलडाणा, लोणार, संग्रामपूर, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर, देऊळगावराजा, चिखली तालुक्यात गळफास व विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या करण्याचे सत्र सुरू आहे. यात विद्यार्थी व विवाहितेचा समावेश आहे.

Web Title: Crime in Buldana district increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.