आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:51+5:302021-06-22T04:23:51+5:30
एकलारा येथे १८ मे राेजी हराळखेड येथील दत्तात्रय काशीराम शेळके यांनी सासूरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या केली हाेती़ शेळके ...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा
एकलारा येथे १८ मे राेजी हराळखेड येथील दत्तात्रय काशीराम शेळके यांनी सासूरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या केली हाेती़ शेळके यांच्या मुलाने पाेलिसात तक्रार देऊन विनयभंगाची खाेटी तक्रार दिल्यानेच आत्महत्या केल्याची तक्रार चिखली पाेलिसात दिली हाेती़ तसेच दत्तात्रय शेळके यांना काही जणांनी मारहाण केली हाेती. तसेच खाेट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचे पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले हाेते़ याप्रकरणी पाेलिसांनी अनिल जुमडे, विष्णू सीताराम आराख, भगवान संपत आराख, राजू विष्णू आराख, गौतम बाबुराव जाधव व जयश्री गौतम जाधव यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ सहाही आराेपी पसार झाले असून, पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत़ पुढील तपास चिखली पाेलीस करीत आहेत़