बेकायदा दारू बाळगणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:34 IST2021-05-23T04:34:59+5:302021-05-23T04:34:59+5:30

देऊळगाव राजा : शहरातील विविध भागात दोन ठिकाणी छापा मारून पोलिसांनी २३ हजारांची बेकायदा देशी दारू जप्त केली असून ...

Crime against four persons for illegal possession of alcohol | बेकायदा दारू बाळगणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

बेकायदा दारू बाळगणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

देऊळगाव राजा : शहरातील विविध भागात दोन ठिकाणी छापा मारून पोलिसांनी २३ हजारांची बेकायदा देशी दारू जप्त केली असून चौघांविरुद्ध अवैध २१ मे राेजी गुन्हा दाखल केला आहे़

दारूची दुकाने कडक निर्बंधामुळे बंद असताना बेकायदा देशी दारूविक्री केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे पोलिसांच्या दोन पथकाने शहरातील दोन ठिकाणी छापा मारून एकूण २३ हजार रुपयांची देशी दारू जप्त केली़ दरम्यान, शहरातील शिवाजी नगर परिसरात छापा मारून पोलिसांनी ८ हजार ५८० रुपये किमतीच्या १४३ नग दारूच्या बॉटल जप्त केल्या़ तसेच सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाळू दत्ता पवार, विश्वंभर दिगंबर चव्हाण दोघे राहणार शिवाजीनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला़ दुसऱ्या प्रकरणात १४ हजार ४०० रुपये किमतीच्या २४० बेकायदा दारूच्या बॉटल शिवाजीनगर परिसरात छापा टाकून पोलिसांनी जप्त केल्या़ या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक बस्वराज तमशेट्टे यांच्या फिर्यादीवरून अनिल परमेश्वर जाधव, रा़ त्र्यंबक नगर व रामेश्वर दत्‍ता पवार यांच्याविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Crime against four persons for illegal possession of alcohol