वादातून डोके फोडल्याने चौघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 21, 2017 00:40 IST2017-04-21T00:40:33+5:302017-04-21T00:40:33+5:30
खामगाव : पोलीस स्टेशनमधील प्रकरण आपसात मिटविण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन वाद घालत युवकास मारहाण केल्याची घटना सजनपुरी येथे घली.

वादातून डोके फोडल्याने चौघांविरुद्ध गुन्हा
खामगाव : पोलीस स्टेशनमधील प्रकरण आपसात मिटविण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन वाद घालत युवकास मारहाण केल्याची घटना सजनपुरी येथे घली.
याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राम नारायण भगतपुरे (वय २५) रा.सजनपुरी याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की नारायण धनू सावरकर व आदित्य गोपालसेठ यांचा मुलगा या दोघांनी बुधवारी घरी जात असताना रस्त्यात थांबवून तुझी केस आम्ही आपसात मिटवितो, आम्हाला पाच हजार दे, अशी मागणी केली. मात्र, या दोघांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी वाद घालत शिवीगाळ केली, तर नारायण सावरकर याने डोक्यावर मारुन जखमी केले. या फिर्यादीवरुन पोलिसांनी उपरोक्त दोघांविरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. नारायण धनू सावरकर याने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले, की गावातील दुकानावर उभा असताना हिरा तुळशीराम भगतपुरे, आकाश हिरा भगतपुरे व राम नारायण भगतपुरे यांनी पुतण्याला का मारले, म्हणून वाद घालत चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध कलम ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.