विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा
By सदानंद सिरसाट | Updated: September 17, 2023 18:29 IST2023-09-17T18:29:45+5:302023-09-17T18:29:55+5:30
शुक्रवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा
खामगाव (बुलढाणा) : लग्नानंतर सात वर्षांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरा, नणंद, जेठ अशा सात जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसात शुक्रवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
खामगाव तालुक्यातील रोहणा येथील माहेर असलेल्या विवाहितेचे २०१४ मध्ये बुलढाणा येथील वाॅर्ड दोन भीमनगर येथील रहिवासी असलेल्या विजय हरी जाधव याच्याशी झाले. दरम्यान, त्यांना तीन अपत्ये झाली. त्यानंतर पतीला दारूचे व्यसन लागले. तसेच त्याने चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. २० मे रोजी रात्री पतीसह सासू सुशीला हरी जाधव या दोघांनी मारहाण केली.
जेठाणी सरला संजय जाधव, जेठ संजय हरी जाधव, सुनील हरी जाधव यांनी मारहाण करण्यासाठी चिथावणी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पाेलिसांनी पती, सासूसह पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.