विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: March 27, 2017 13:46 IST2017-03-27T13:46:54+5:302017-03-27T13:46:54+5:30

शारीरीक आणि मानसिक छळ होत असल्याने त्रासाला कंटाळून बहिणीने आत्महत्या केल्याच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

The crime against the father-in-law of a married man in a marriage | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा

जानेफळ (बुलडाणा): हुंड्याच्या पैशाच्या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून
मारहाण व शारीरीक आणि मानसिक छळ होत असल्याने त्रासाला कंटाळून बहिणीने
आत्महत्या केल्याच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हे
दाखल करण्यात आले आहे.
जानेफळ येथील कल्पना वसंत लोणकर या २१ वर्षीय विवाहितेने २४ मार्च रोजी
राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी कल्पना यांचा भाऊ
गणेश गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दिली असून, बहिणीच्या आत्महत्येला
सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. कल्पना हिला पती वसंता
नामदेव लोणकर, सासू लिलबाई नामदेव लोणकर, नणंद मंदा नामदेव लोणकर त्रास
देत होते. त्यामुळे कल्पनाने यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.
या तक्रारीवरून वसंता लोणकर, नामदेव लोणकर, मंदा लोणकर यांच्याविरूद्ध
कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The crime against the father-in-law of a married man in a marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.