बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:57 IST2017-09-15T23:52:57+5:302017-09-15T23:57:55+5:30
जानेफळ: वाहनाच्या धडकेने पाथर्डी घाटात ठार झालेल्या बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी वन विभागाच्यावतीने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा
ठळक मुद्देगुरूवारी सायंकाळी पाथर्डी घाटात वाहनाच्या धडकेने ठार झाला बिबट्या वनविभागाने अज्ञात वाहनचालकाविरूद्ध दाखल केला गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ: वाहनाच्या धडकेने पाथर्डी घाटात ठार झालेल्या बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी वन विभागाच्यावतीने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डुघ्रेकर यांनी सदर बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यावेळी त्याच्या मानेच्या मणक्याला मार बसल्याचे निदर्शनास आले. तसेच उजव्या बाजूने डोळा व नाकातून रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले आहे. बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.