हल्लाप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:30 IST2021-01-17T04:30:10+5:302021-01-17T04:30:10+5:30

बुलडाणा : शहराजवळच असलेल्या देऊळघाट येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कारणावरून एका उमेदवाराच्या घरावर १०० ते १५० जणांच्या जमावाने हल्ला करीत ...

Crime against 25 people in assault case | हल्लाप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा

हल्लाप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा

बुलडाणा : शहराजवळच असलेल्या देऊळघाट येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कारणावरून एका उमेदवाराच्या घरावर १०० ते १५० जणांच्या जमावाने हल्ला करीत मारहाण केली हाेती. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी २० ते २५ जणांविरुद्ध शनिवारी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

देऊळघाट येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी शुक्रवारी (दि. १५) सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी मोमीनपुरा येथे वॉर्ड क्रमांक ४ चे उमेदवार व माजी सरपंच मुश्ताक अहमद यांच्या घरावर विरोधी गटातील १०० ते १५० जणांनी दगडफेक केली हाेती. यामध्ये सईद खान हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मुशताक अहेमद गुलाम अहेमद यांच्या फिर्यादीवरून बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी २० ते २५ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकार हे करीत आहेत.

पाेलिसांवर दगडफेक : गुन्हा दाखल

दरम्यान, हा हल्ला सुरू असताना घटनास्थळावर पाेहोचलेल्या पाेलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पाेलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against 25 people in assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.