राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST2021-09-03T04:36:35+5:302021-09-03T04:36:35+5:30
देऊळगावराजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल सी. बी. एस. ई स्कूलच्या प्रांगणात लेदर बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. हा ...

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रिकेट स्पर्धा
देऊळगावराजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल सी. बी. एस. ई स्कूलच्या प्रांगणात लेदर बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सामना ५०-५० षटकांचा घेण्यात आला. या स्पर्धेला देऊळगावराजा, सिंदखेडराजा, देऊळगाव मही आदी तालुक्यामधील युवा क्रीडाप्रेमींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी प्रमुख म्हणून राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे सचिव डॉ. रामप्रसाद शेळके यांनी कोरोनासारख्या महामारीपासून दूर राहण्यासाठी आपण मैदानी खेळ खेळले पाहिजे आणि शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवले पाहिजे, असे सांगून खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित उद्योजक राजेश खंडारे, सुजित गुप्ता, राजेश पंडित, क्रिकेट कोच रामेश्वर इंगळे, कार्तिक भोसले, ज्योतिरादित्य शेळके, सोहेल शेख, अथर्व पंडित, स्वराज शिंगणे, अभिषेक फुलझाडे, ऋतुराज शिंगणे यांनी सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.