घरकुल वाटपात सावळा गोंधळ!

By Admin | Updated: May 1, 2017 01:03 IST2017-05-01T01:03:04+5:302017-05-01T01:03:04+5:30

नांदुरा- तालुक्यात रमाई योजनेतील घरकुल वाटपाच्या सावळ्या गोंधळात योजनेचे निकष न पाळल्यामुळे गरिबांच्या वाट्याची घरे इतरांना दिल्याचे स्पष्ट होत आहे.

Crib clutter is a tragedy! | घरकुल वाटपात सावळा गोंधळ!

घरकुल वाटपात सावळा गोंधळ!

संदीप गावंडे - नांदुरा
नांदुरा तालुक्यात रमाई योजनेतील घरकुल वाटपाच्या सावळ्या गोंधळात योजनेचे निकष न पाळल्यामुळे गरिबांच्या वाट्याची घरे इतरांना दिल्याचे स्पष्ट होत असून शासनानेच ठरविलेले निकष अधिकाऱ्यांनी कशाचे आधारावर नाकारले हे अनाकलनीय आहे.
२०१५-१६ आर्थिक वर्ष संपतांना जिल्ह्यात रमाई योजनेचे उद्दिष्ट वाढीव आले. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात हे उद्दिष्ट लोकसंख्येच्या प्रमाणानुसार वाटप करण्यात आले परंतु नांदुरा तालुक्यात सदर वाढीव उद्दिष्टाकरिता लाभार्थ्यांची निवड करताना विशिष्ट ग्रामपंचायतींनाच प्राधान्य दिल्याचे दिसत असून सदर लाभार्थी निवड ही निकषाच्या आधारे करण्यात आली नाही.
रमाई आवास योजनेकरिता लाभार्थी दारिद्रय रेषेवरील (एपीएल) असावा असा निकष आहे. मात्र सदर निकषाचे उल्लंघन झाले आहे. तसेच लाभार्थ्यांवर पक्के घर नसावे ही अट असताना यामध्ये पक्के घर असलेले लाभार्थी निवडण्यात आल्याची माहिती आहे. तसेच रमाई आवास योजनेकरिता संपूर्ण तालुक्यातील एपीएल परंतु एक लक्ष रूपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांची यादी (बुकलेट) तयार करून त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंजुरात घ्यावी लागते. मात्र अशी तालुक्याची कोणतीच यादी मंजूर झालेली नाही. त्यामुळे मनमानी कारभार करीत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून सदर लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा आहे की नाही? घर कच्चे आहे की पक्के याची कोणतीही शहानिशा संबंधित विभागाने केलेली नाही. त्यामुळे खऱ्या गरजू लोकांना घरकुलापासून वंचीत राहावे लागत आहे. वाढीव उद्दिष्टात मंजूर केलेल्या रमाई आवास योजनेतील नावे ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘ड’ यादीतीलच घेण्यात आली आहेत. त्यामुळे मार्च एडींगच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करीत गरीबांची घरे पळविण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे.

पात्र लाभार्थींनाच घरकूल मिळतील याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. रमाई घरकुलाबाबतीत योग्य ती कारवाई निश्चित करण्यात येईल. तसेच प्रपत्र ‘ब’ मध्ये नाव असणाऱ्या एससी, एसटी व अल्पसंख्याक लाभार्थ्यांजवळ स्वत:ची जागा असल्यास त्यांनी स्वत: मला भेटावे त्यांना निश्चित घरकुलाचा लाभ देण्यात येईल.
- बी.एम. मेघावत,गटविकास अधिकारी नांदुरा

Web Title: Crib clutter is a tragedy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.