युवकांचे भगवे वादळ निर्माण करा - विक्रांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:25+5:302021-08-25T04:39:25+5:30

आ. श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृहात २३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या मेळाव्यात ...

Create a saffron storm for the youth - Vikrant Patil | युवकांचे भगवे वादळ निर्माण करा - विक्रांत पाटील

युवकांचे भगवे वादळ निर्माण करा - विक्रांत पाटील

आ. श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृहात २३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा प्रदेश युवा मोर्चा प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेश सचिव सोपान कणेरकर, प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ, बादल कुळकर्णी, विशाल केचे, प्रदीप देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, विजय वाळेकर, चेतन देशमुख, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, रामदास देव्हडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सिंधू खेडेकर, शहराध्यक्ष सुनिता भालेराव, पं.स.सभापती सिंधू तायडे, तालुकाध्यक्ष डॉ.कृष्णकुमार सपकाळ, बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड.सुनील देशमुख, संतोष काळे, पं.स.सदस्य मनीषा सपकाळ, नगरसेवक विजय नकवाल, गोविंद देव्हडे, नामू गुरुदासनी, सुभाषअप्पा झगडे, सुरेंद्रप्रसाद पांडे, सुहास शेटे, प्रा.वीरेंद्र वानखेडे, सचिन कोकाटे, युवराज भुसारी, शैलेश बाहेती, नगरसेविका अर्चना खबुतरे, जि.प. सदस्य सुनंदा शिनगारे विजय खरे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी पक्षाच्या युवा मोर्चाच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. युवा वॉरीयर्स शाखा फलकाचे अनावरण युवा वॉरीयर्स महाराष्ट्र प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आली. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे तर प्रास्ताविक शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी केले. यशस्वीतेसाठी मंदार बाहेकर, योगेश राजपूत, विशाल विसपुते, विनायक भाग्यवंत, सिद्धेश्वर ठेंग, संदीप लोखंडे, योगेश झगडे, शंकर उद्रकर, कैवल्य कुळकर्णी, चैतन्य जोशी, अक्षय भालेराव, शैलेश सोनुने, प्रसाद ढोकणे, विष्णू मेथे, श्रीकांत शिनगारे, आकाश चुनावाले, नितीन पंजवाणी, आयुष कोठारी, श्रेयस शिसोदिया, मयूर गीते, विक्की साळवे, प्रशांत अक्कर, ऋषी सीताफळे, कपिल झगडे, स्वप्नील कुळकर्णी, शुभम शेळके, श्याम दिवटे, शुभम खबुतरे, विक्रांत महाजन आदींनी परिश्रम घेतले.

आ.महाले यांच्या निवासस्थानी भेट

मेळाव्यासाठी आलेले विक्रांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आ. श्वेता महाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित सर्वांना आ.महाले राखी बांधून त्यांचे स्वागत केले.

Web Title: Create a saffron storm for the youth - Vikrant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.