पहिल्या दिवशी २00 खातेदारांच्या फाइल्स तयार

By Admin | Updated: June 23, 2016 23:30 IST2016-06-23T23:30:29+5:302016-06-23T23:30:29+5:30

पीक कर्ज नूतनीकरण व पुनर्गठनाचा शेतक-यांनी घेतला लाभ.

Create 200 account holders files on the first day | पहिल्या दिवशी २00 खातेदारांच्या फाइल्स तयार

पहिल्या दिवशी २00 खातेदारांच्या फाइल्स तयार

सावत्रा (जि. बुलडाणा): स्टेट बँक शाखा शेंदला व महसूल विभाग मेहकर यांनी बँक खातेदारांसाठी ठेवलेल्या शिबिराला बँकेच्या खातेदारांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी २२ जून रोजी पहिल्या दिवशी २00 खातेदारांच्या फाइल्स तयार केल्या.
नायगाव दत्तापूर येथे २२ व २३ जून रोजी भारतीय स्टेट बँक शेंदला शाखा व महसूल विभाग मेहकर यांनी केलेल्या आयोजनामध्ये सावत्रा, मोळा, शेंदला, नायगाव दत्तापूर, लावणा, कळंबेश्‍वर, सारशिव, थार व बरदापूर, भालेगाव येथील शेतकर्‍यांनी भाग घेतला. बँकेच्या खातेधारकांनी त्यांचा वेळ कागदपत्रे जमा करण्यामध्ये जावू नये व त्यांना वेळेवर पीक कर्ज द्यावे, या उद्देशाने वरील गावचे तलाठी यांना हजर ठेवण्यात आले. दोन दिवशीय शिबिरामध्ये ५00 कर्ज प्रकरणे तयार करण्यात आली. तयार करण्यात आलेली कर्ज प्रकरणे तपासून बँक प्रशासन वरील गावांमध्ये जावून त्यांनी फाइल्स शिबिरामध्ये जमा केल्या. त्यांच्या घरी जावून त्यांच्या सह्या घेणार व त्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकेची तारीख देणार आहेत. यामुळे कर्जदारांच्या होणार्‍या चकरा थांबणार आहेत. शिबिराचे अध्यक्ष तहसीलदार काकडे यांनी उद्घाटन केले, तर प्रमुख पाहुणे भारतीय स्टेट बँक बुलडाणाचे परब, पोस्टे जानेफळचे मते हजर होते. संचालन मंडळ अधिकारी बोरकर यांनी तर आभार उमाळकर यांनी मानले.
 

Web Title: Create 200 account holders files on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.