विठ्ठलवाडीत गोठ्याला आग, तीन लाखांचे नुकसान
By संदीप वानखेडे | Updated: February 3, 2024 18:31 IST2024-02-03T18:30:58+5:302024-02-03T18:31:12+5:30
गोठा जळत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली.

विठ्ठलवाडीत गोठ्याला आग, तीन लाखांचे नुकसान
डोणगाव : विठ्ठलवाडी येथील शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून तीन लाखांचे नुकसान झाले ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. ग्राम विठ्ठलवाडी उधवा शिवारात गावा लगत शीलाबाई विठ्ठलराव देशमुख यांची शेती भिका दुधा पवार यांनी ठोक्याने केलेली आहे, त्यात शेळ्यांसाठी एक गोठा केलेला आहे, ३ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजता दरम्यान गोठ्याला आग लागली, यावेळी भीमराव पवार घरी नास्ता करण्यासाठी आले होते, अशात शेतात गोठ्याला आग लागली, लाकडापासून बनवलेल्या गोठ्याला लागलेल्या आगीने मोठे रुद्र रूप धारण केले, यामध्ये आठ शेळ्या, चार बोकड अशा १२ शेळ्या जळाल्याने, ६ शेळ्या गंभीर जखमी झाल्या, पंचनामा तलाठी राजू धावडे व कोतवाल अनिल शिरसकर यांनी केला.
डोणगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमर नागरे यांनी भेट देऊन पाहणी केली. गोठा जळत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. गोठा विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र गोठ्याच्या समोरील भागात ताडपत्री टाकलेली असल्याने ताडपत्री जळेपर्यंत कोणालाही गोठ्यात जाता आले नाही.