सवडद येथे वीज पडल्याने गाय ठार

By Admin | Updated: May 9, 2016 02:03 IST2016-05-09T02:03:54+5:302016-05-09T02:03:54+5:30

विजांच्या कडकडाटासह बरसला पाऊस

Cow killed in electricity due to electricity collapse | सवडद येथे वीज पडल्याने गाय ठार

सवडद येथे वीज पडल्याने गाय ठार

साखरखेर्डा (जि. बुलडाणा): साखरखेर्डा व परिसरात रविवारी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली, तर सवडद येथे दिनकर गुलाब देशमुख यांच्या शेतात वीज पडून गाय ठार झाल्याची घटना ८ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. यामध्ये शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. साखरखेर्डा परिसरात रविवारी सकाळपासून ढगाव वातावरण होते; मात्र दुपारी २ वाजेदरम्यान अचानक आकाशात ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

Web Title: Cow killed in electricity due to electricity collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.