शौचास जाणाऱ्या व्यक्तीवर रानडुकराचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:39 IST2021-08-13T04:39:04+5:302021-08-13T04:39:04+5:30

लोणार : येथील सरोवर परिसरातील मुस्लिम कबरस्तानच्या बाजूला असलेल्या शहरातील एका व्यक्तीवर बुधवारी (ता.१२) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ...

Cow attack on a person going to the toilet | शौचास जाणाऱ्या व्यक्तीवर रानडुकराचा हल्ला

शौचास जाणाऱ्या व्यक्तीवर रानडुकराचा हल्ला

लोणार : येथील सरोवर परिसरातील मुस्लिम कबरस्तानच्या बाजूला असलेल्या शहरातील एका व्यक्तीवर बुधवारी (ता.१२) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान रानडुकराने हल्ला करून जखमी केले. जखमी व्यक्तीवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रामचंद्र अर्जुन पवार (वय ५५) हे सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शौचासाठी बाहेर जात असताना पाठीमागून धावत येऊन रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. रामचंद्र पवार यांच्या चेहऱ्यावर जखम झाल्याने ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बुलडाणा येथे शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले. सरोवर हे वन्यजीव अभयारण्य असल्यामुळे या परिसरामध्ये हिंसक प्राण्यांचा वावर असतो. यामध्ये बिबट, तडस, रानडुक्कर व इतर प्राणी असल्यामुळे शेळी, जनावरे यांच्यावर सतत हल्ले झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या घटनेमुळे आता सरोवराच्या किन्ही रस्त्यावर शहरातील सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Cow attack on a person going to the toilet