बेटी बचाओ बेटी पढाओसाठी न्यायालयांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 19:51 IST2017-08-02T19:48:10+5:302017-08-02T19:51:02+5:30
माेताळा : तालुका विधी समिती व वकिल संघ यांच्याद्वारा स्थानिक स्व. बबनराव देशपांडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात टी बचाओ बेटी पढाओ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बेटी बचाओ बेटी पढाओसाठी न्यायालयांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
माेताळा : तालुका विधी समिती व वकिल संघ यांच्याद्वारा स्थानिक स्व. बबनराव देशपांडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात टी बचाओ बेटी पढाओ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. ए. गवई हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन न्यायाधीश जी. आर. दंडे, अॅड. गाळणे, अॅड. शर्मा, अॅड. धुरंधर उपस्थित होते. सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी न्यायाधीश जी. आर. दंडे यांनी मुलींचा घटता जन्मदर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामजिक समस्या या विषयी विविध उदाहरणाच्या माध्यमातुन सविस्तर मार्गदर्शन केले. पुढे आपल्या भाषणात त्यांनी भारतातील महान स्त्री यांचे दाखले देत जिजाऊ, अहिल्या, सावित्री, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील या स्त्रीयांचा कर्तृत्वावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. भविष्यात विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून समाज जागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षकवृंद, विद्यार्थी व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विधी क्षेत्रातील अनेक व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तािवक अॅड. गाळणे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन प्रा. नितीन भुजबळ यांनी केले.