खामगाव: अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्या जोडप्यास शिवाजी नगर पोलीसांनी मलकापूर येथून अटक केली. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या आई- वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घाटपुरी येथील गजानन कॉलनीतून शुभम विठ्ठल शेलकर आणि वैशाली कुंभरे उर्फ सपना समरथ साहु (वय ३१ वर्षे) या दोघांनी एका अल्पवयीन मुलीस २४ जुलै रोजी पळवून नेले. याप्रकरणी पिडीतेच्या वाडीलांच्या तक्रारीवरून उपरोक्त दोघांविरोधात शिवाजी नगर पोलीसांनी भादंवि कलम ३६३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी वैशाली कुंभरे ऊर्फ सपना समरथ साहु व शुभम विठ्ठल शेलकर यांचा गोपनीय बातमीदार व तांत्रिक पुराव्याचे आधारे शोध घेतला. दोन्ही आरोपींना नांदुरा व मलकापूर येथून शुक्रवार २७ जुलै रोजी अल्पवयीन मुलीसह ताव्यात घेवुन अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून पंचासमक्ष आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक विवेक पाटील, पोलीस निरिक्षक अरूण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश घुगे व शैलद्रसिंह राजपुत, राजू आडवे, अमोल तरमळे यांनी केला आहे.