कापसाच्या ट्रकला आग
By Admin | Updated: February 23, 2015 00:20 IST2015-02-23T00:20:12+5:302015-02-23T00:20:12+5:30
मलकापूर- नांदुरा राष्ट्रीय महामार्गावरील घटना.

कापसाच्या ट्रकला आग
मलकापूर (जि. बुलडाणा): मलकापूर- नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील मलकापूरजवळील हॉटेल सूर्याजवळ दुपारी ३ वाजता कापसाच्या गाठीने भरलेल्या ट्रकला रस्त्यावरील विद्युत तारेच्या घर्षणाने आग लागली. त्यामुळे ट्रकमधील कापसाच्या गाठी पूर्णपणे जळाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशामक गाडी आग विझविण्याकरिता घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. मलकापूर येथून जवळच मलकापूर-नांदुरा मार्गावर हॉटेल सूर्याच्या पाठीमागून कापसाच्या गाठीने भरलेला ट्रक जुन्या वाघुड रस्त्याने महामार्गावर येत अस ताना सूर्या हॉटेलच्या मागील रस्त्यावरील विद्युत तारेचा स्पर्श कापसाच्या गाठींना झाला. त्यामुळे ट्रक (एमएच १८-८६३५) मधील कापसाच्या गाठींनी पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन गाडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटने विद्युत तारा तुटल्या व परिसरातील विद्युत उपकरणांचेसुद्धा नुकसान झाले. ट्रकमध्ये भरलेल्या कापसाच्या गाठी ही मलकापूर येथील आदित्य बाहेती यांच्या मालकीच्या हो त्या. या ट्रकमध्ये कापसाच्या गाठी ओव्हरलोड झाल्याने त्या विद्युत तारेला टेकल्या व आगीमुळे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.