मोताळ्यात कापसाचे उत्पादन घटणार?
By Admin | Updated: November 6, 2014 23:12 IST2014-11-06T23:12:39+5:302014-11-06T23:12:39+5:30
शेतकरी हवालदिल : अल्प पावसाचा परिणाम.

मोताळ्यात कापसाचे उत्पादन घटणार?
मोताळा (बुलडाणा): संपूर्ण तालुक्यात उशिरा व कमी पाऊस झाल्याने त्याचा थेट परिणाम कपाशी पिकावर झाल्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात कमालीची घट होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दिसत असून, परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्यामुळे कोरडवाहू शेतकर्यांच्या घरात येणारा कापूस कमी होणार असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
ऐन पावासाळय़ात कमी व उशिरा पाऊस झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या. बोटावर मोजण्याइत पत शेतकरी सोडले, तर संपूर्ण तालुक्यातील शेतकरी वर्ग कोरडवाहू शेतीच्या भरवशावर उदरनिर्वाह करीत आला आहे. त्यामुळे शेतकर्यांची दरोमदार निसर्गाच्या पावसावर अवलंबून असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पावसाने पावसाळय़ात व परतीच्यावेळी पाठ फिरविल्याने नदी, नाले अद्यापही कोरडेच आहे. शेतकर्यांनी जीवाचे रान करून जगवलेली पिके पर तीच्या पावसाने दगा दिल्यामुळे करपून जात असून, ऊन तापायला लागल्याने कशीबशी जगविली गेलेली पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. सोयाबीनचे पीक तर केव्हाच शे तकर्यांच्या हातातून गेले आहे. हीच परिस्थिती कापसाच्या उत्पादनाची झाली आहे. शासानाने जाहीर केलेला आधारभूत भाव अत्यंत कमी आहे. खते व बियाणांचे भाव वाढतात त्या तुलनेत कापसाचे भाव वाढविले जात नाहीत. यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे.