पाच वर्षात कापसाचे उत्पादन घटले

By Admin | Updated: December 8, 2014 01:32 IST2014-12-08T01:32:52+5:302014-12-08T01:32:52+5:30

सोयाबीनला पसंती : अमरावती विभागातील चित्र.

Cotton production declined in five years | पाच वर्षात कापसाचे उत्पादन घटले

पाच वर्षात कापसाचे उत्पादन घटले

बुलडाणा : अमरावती विभागात कापसाच्या उत्पादकतेत मोठी घट झाली आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या तुलनेत गत पाच वर्षात कपाशीच्या क्षेत्रात निम्म्याने घट झाली आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या नजरअंदाज अहवाल २0१३-१४ नुसार मात्र यंदा कपाशीचे उत्पादन बुलडाणा जिल्ह्यात वाढणार असल्याचे संकेत आहे.
२0१२-१३ मध्ये जिल्ह्यात कपाशीचा पेरा २ लाख ४४ हजार ३४ हेक्टरवर होता. यंदा २0१३- १४ साठी कपाशीसाठी २ लाख ५५ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. हे क्षेत्र ग तवर्षापेक्षा निश्‍चितच जास्त आहे. एकूण जिल्ह्यातील पीक परीक्षणातून कृषी विभागाने तयार केलेल्या नजरअंदाज अहवालात कापसाची हेक्टरी ३१४ क्विंटल उत्पादकता निश्‍चित करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत हे २0 टक्क्यांनी जास्त आहे.
0बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी प्रभावित क्षेत्र ७६ लाख ४८ हजार १७ हेक्टर एवढे आहे. त्यापैकी कापसासाठी २ लाख ५५ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या अतवृष्टीमुळे कापसाचे ४२६.0५ हेक्टरवरील पीक बाधित झाले. त्याचा सरळ परिणाम कापसाच्या उत्पादनावर झाला. विभागात मात्र गेल्या पाच वर्षात कपाशीबाबत चित्र वेगळे दिसले. यावर्षी २0१३-१४ मध्ये केवळ ८१ हजार ८८0 हेक्टरवर कपाशी, तर १ लाख ५५ हजार १00 हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. २00८-0९ पासून २0१२-१३ पर्यंतच्या पाच वर्षांत कपाशीच्या उत्पादनात सातत्याने घट दिसून येत आहे. २00८-0९ मध्ये हे क्टरी रुईची उत्पादकता ३८0 किलो होती. २0११-१२ मध्ये उत्पादकता २८४, तर २0११-१२ मध्ये २४४ एवढी खाली घसरली आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार, अमरावती विभागात २00८-0९ मध्ये दोन लाख ४३ हजार ६५ गाठींचे, तर २0१२-१३ मध्ये एक लाख ४४ हजार ८४ गाठींचे उत्पादन झाले. यावर्षी लांबलेला पाऊस, किडींचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर झालेल्या अल्प वृष्टीचा परिणाम कपाशीवर होणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Cotton production declined in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.