कापसाला केवळ ५0 रुपयांची भाववाढ
By Admin | Updated: October 30, 2015 02:02 IST2015-10-30T02:02:38+5:302015-10-30T02:02:38+5:30
तीन वर्षांंपासून कापसाच्या हमीभावात नाममात्र वाढ.
_ns.jpg)
कापसाला केवळ ५0 रुपयांची भाववाढ
नाना हिवराळे / खामगाव : कापूस पणन महासंघाकडून २0१५-१६ या वर्षाकरिता कापूस खरेदीसाठी हमी भाव जाहीर झाला आहे. गतवर्षीपेक्षा ५0 रुपये प्रती क्विंटल नाममात्र भाववाढ यंदा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांंंपासून पणन महासंघाने कापसाला दिलेला भाव हा सरासरी ५0 ते १00 रुपयांनीच वाढविलेला आहे. शेतकर्यांना योग्य हमी भाव देण्यासाठी कापूस पणन महासंघामार्फत कापूस खरेदी केली जाते. यासाठी कापसाची आधारभूत किंमत ठरविली जाते. यावर्षी ४ हजार १00 रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. खामगाव विभागात शेगाव, जळगाव जामोद, खामगाव, वरवट बकाल, मलकापूर, देऊळगाव राजा व देऊळगाव मही या ७ ठिकाणी पणन महासंघाची खरेदी केंद्रे आहेत. दरवर्षी १५ नोव्हेंबरनंतर कापूस खरेदी सुरू होते. गेल्या काही वर्षांंंपासून व्यापारी व पणन महासंघाच्या भावात तफावत येत असल्याने शेतकर्यांनी व्यापार्यांनाच कापूस विक्री करण्यास पसंती दिली आहे. यामुळे अनेकदा शासकीय कापूस खरेदी केंद्रे ओस पडलेली दिसून आली. व्यापार्यांकडून ४00 ते ५00 रुपयापर्यंंंत भाववाढ मिळत असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी खासगी व्यापार्यांनाच पसंती देत आहे. २0१४-१५ या वर्षात पणन महासंघाने ४0५0 रुपये भाव दिला होता. तेव्हा खासगी व्यापारी यापेक्षा जास्त भाव देत असल्याने पणन महासंघाकडे १ लाख ७ हजार ३३ क्विंटलच कापूस खरेदी झाली होती. विभागातील जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा या तीन ठिकाणीच कापूस खरेदी केंद्र गेल्या वर्षी सुरू होते. खामगाव, नांदुरा, मलकापूर व देऊळगाव मही या चार ठिकाणी भारतीय कापूस निगम (सीसीआय) च्यावतीने कापूस खरेदी झाली होती. यावर्षीही अवघी ५0 रुपये भाव वाढ पणन महासंघाने केली आहे. सध्या शेतकर्यांचा कापूस वेचणीचा हंगामही सुरू झाला आहे.
*व्यापा-यांकडून क्विंटलमागे ४,३00 रुपयांचा भाव
यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगाम हातचा गेला आहे. शेतकर्यांचे हमी पीक म्हणून ओळखल्या जाणार्या कपाशीचा पेरा मागील काही वर्षांंंपासून घटला आहे. कापसाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणार्या या भागात शेतकरी कपाशीपासून दूर गेला आहे. यावर्षी कापसाची भाववाढ चांगली होणार या अपेक्षेने शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत होता; परंतु ३९00-४१00 रूपये प्रति क्विंटल दरम्यान भाव जाहीर झाल्याने शेतकर्यांची पार निराशा झाली आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात व्यापार्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे. ४२00 ते ४३00 या दराने कापूस ते खरेदी करीत आहेत.पणन महासंघाच्या खरेदीला अद्यापही वेळ आहे. तोपर्यंंंत खाजगी व्यापारी पड्या भावानेच खरेदी करतील असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा होरा आहे. एकंदरीत यावर्षी कपाशीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन नसल्याने कापसाला भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी तूर्तास तसे चित्र दिसून येत नाही. हंगामाची सुरुवात आता झाली असली तरी व्यापारीही तुलनेने कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत.