जलवाहिन्यांची दुरूस्ती युद्धपातळीवर
By Admin | Updated: February 3, 2015 00:12 IST2015-02-03T00:12:26+5:302015-02-03T00:12:26+5:30
दुष्काळाच्या काळात पाण्याचा होऊ नये अपव्यय म्हणून खामगाव पालिका प्रशासन लागले कामाला.

जलवाहिन्यांची दुरूस्ती युद्धपातळीवर
खामगाव (जि. बुलडाणा) : पाण्याची गळती थांबविण्यासोबतच गढूळ पाण्याचा पुरवठा होत असलेल्या पाईपलाईनच्या दुरूस्तीचे काम नगरपालिका प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. शहरातील फरशी लाईन, सिंधी कॅम्प, कापड बाजारातील पाईपलाईन दुरुस्तीचे काम नगरपालिका प्रशासनाच्यावतीने केले जात आहे. शहरातील फरशी लाईन, घाटपुरी नाका, सिंधी कॅम्प, कापड बाजारात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनुसार नगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून शहरातील फरशी लाईन, कापड बाजार, सिंधी कॅम्प भागात सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. या भागातील काँक्रीट रस्त्यावर पाच-सात फुटाच्या अंतरावर खड्डे खोदून पाईपलाईनच्या गळतीचे काम करण्यात आले. या कामासाठी खासगी कामगारांसह खासगी यंत्रसामग्रीचाही वापर केल्या जात आहे. शहरातील पाईपलाईन लिकेजमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचा सर्वाधिक त्रास वृद्ध व लहान मुलांना होत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या; मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.