त्या प्रेताची ओळख पटली - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:32 IST2021-03-28T04:32:35+5:302021-03-28T04:32:35+5:30

वरवंड बीटमधील जंगलात गस्त घालत असताना पाथर्डी घाटानजीक वन तपासणी नाक्यापासून काही अंतरावर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी वनरक्षक वसंत ...

That corpse was identified - A | त्या प्रेताची ओळख पटली - A

त्या प्रेताची ओळख पटली - A

वरवंड बीटमधील जंगलात गस्त घालत असताना पाथर्डी घाटानजीक वन तपासणी नाक्यापासून काही अंतरावर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी वनरक्षक वसंत महादेव फुके व वनमजूर वसुदेव त्र्यंबक राज यांना अज्ञात व्यक्तीचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले होते. त्यावेळी पोलिसांनी पंचनामा करून वैद्यकीय अधिकारी डॉ. मगर यांनी जागीच शवविच्छेदन केल्यानंतर प्रेतावर अंत्यसंस्कार केले होते. या घटनेप्रकरणी जानेफळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केल्यानंतर प्रेताच्या अंगातील कपडे, हातातील कडा तसेच घड्याळ व इतर वर्णनावरून तपासादरम्यान तो अंजनी बु. येथील सुरेश अमृता पदमणे यांचेच प्रेत होते, असे पोलिसांनी निष्पन्न केले आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार राहुल गोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार प्रल्हाद टकले व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Web Title: That corpse was identified - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.