पालिकांनी विकासाचे आव्हान पेलावे

By Admin | Updated: February 28, 2015 01:14 IST2015-02-28T01:14:33+5:302015-02-28T01:14:33+5:30

बुलडाणा येथे नगर सेवकांचे प्रशिक्षण शिबिर; निवासी उपजिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली गरज.

The corporation should challenge the development | पालिकांनी विकासाचे आव्हान पेलावे

पालिकांनी विकासाचे आव्हान पेलावे

बुलडाणा : वाढती लोकसंख्या व वाढत्या शहरीकरणामुळे नगरपालिकांची जबाबदारी वाढली असून, मूलभूत सुविधा देतानाच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पालिकांनी विकासाचे आव्हान पेलण्यासाठी अधिक सक्षम बनण्याची गरज निवासी उपजिल्हाधिकारी  देशपांडे यांनी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नगर परिषद प्रशासन संचालनालय व विभागीय नागरी तसेच पर्यावरण संशोधन केंद्र व अ.भा.स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा नगरसेवकांसाठी दोन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. याचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी बुलडाण्याचे नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे वरिष्ठ तज्ज्ञ कल्याण केळकर, सेवानवृत्त महापालिका आयुक्त सुरेश पाटणकर, सेवानवृत्त महानगरपालिका उपायुक्त एन.के.आष्टीकर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे यांनी सभागृहातील नगरसेवकांच्या नीतीशास्त्राचा आधार घेऊन उत्तम प्रशासनासाठी नगरसेवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. वाढत्या शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी आगामी काळात विकास आराखडे तयार करण्याचे आवाहन अंभोरे यांनी केले. यावेळी बुलडाण्याचे मु ख्याधिकारी संजीव ओहळ उपस्थित होते.

Web Title: The corporation should challenge the development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.