शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Coronavirus : पिंपळगाव येथील कोरोना संदिग्ध महिलेचा मुक्ताईनगरला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 2:03 PM

Coronavirus : पिंपळगाव येथील कोरोना संदिग्ध महिलेचा मुक्ताईनगरला मृत्यू झाला आहे.

- जयदेव वानखडेलोकमत न्युज नेटवर्क जळगाव जामोद : जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात १२ मेरोजी रात्री १० वाजता संदिग्ध कोरोना रुग्ण असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथील रहिवासी आहे. तिच्यावर १३ मे चे पहाटे साडेतीन वाजता पिंपळगाव काळे येथे प्रशासनाच्या सहकार्याने अंत्यसंस्कार करण्यात आले. आधीच एक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या जळगाव जामोद वासीयांसाठी ही बातमी धक्कादायक ठरणार आहे.कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्याचा अंत्यविधी केला जातो. त्याच पद्धतीने सर्व सुरक्षा पाळून तसेच पीपीई कीट धारण करून तिच्या जवळच्या नातेवाईकांसह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्या महिलेच्या मृतदेहाला दहन करण्यात आले . हा अंत्यविधी पिंपळगाव काळे येथे  उरकण्यात आला. याबाबत प्राप्त माहिती अशी की, सदर महिला ही तिच्या कुटुंबासह मुक्ताईनगर येथे पोट भरण्यासाठी कामानिमित्त राहत होती .गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी ती आजारी असल्याने तेथील शासकीय रुग्णालयात तिला भरती करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असतानाच १२ मे च्या रात्री १० वाजता तिची प्राणज्योत मालवली. ती कोरोना संशयित असल्याची डॉक्टरांनी शक्यता वर्तविली .यामुळे मुक्ताईनगर येथेच सदर महिलेचे स्वाब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे तिचे रिपोर्ट आल्यानंतरच खरे काय ते कळणार आहे. त्यानुषंगाने तिच्या कुटुंबातील पाच जण व इतर जवळचे नातेवाईक असे एकूण आठ जणांना पिंपळगाव काळे येथे क्वारंटीन  करण्यात आलेले आहे. 

प्रशासनाची तारांबळ १२ मे च्या रात्री १० वाजता कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मुक्ताईनगर प्रशासनाकडून जळगाव जामोद प्रशासनाला मिळाली. रात्रीच्या वेळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर ,तहसीलदार शिवाजीराव मगर, नायब तहसीलदार वैभव खाडे, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे ,ठाणेदार सुनील जाधव इत्यादी प्रमुख अधिकाºयांनी तात्काळ सूत्र हलवून रुग्णवाहिकेने महिलेचे पार्थिव रात्रीच पिंपळगाव काळे येथे आणण्यात आले. ती कोरोना संशयित असल्याने शासकीय कार्यवाही नंतर  13 मे च्या पहाटे  साडेतीन वाजताचे  दरम्यान काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत  वैद्यकीय नियमानुसार त्या महिलेला दहन करण्यात आले .या सर्व धावपळीत अधिका?्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात जळगाव जामोद येथे एक कोरोना बाधित रुग्ण असल्याने आधीच सर्व अधिकारी अलर्ट झालेले आहेत. त्यात या नवीन प्रकरणाची एन्ट्री झाल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.

 मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाल्याबाबत रात्री माहिती मिळाली. ती महिला पिंपळगाव काळे येथील मूळ रहिवासी असून तिचे नातेवाईकांचे इच्छेनुसार अंत्यविधी पिंपळगाव काळे येथे करायचा होता. त्यानुषंगाने शासकीय कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सदर महिलेचा मृतदेहास पिंपळगाव काळे येथे दहन देण्यात आले.- वैभव खाडे , नायब तहसीलदार, जळगाव जामोद

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद